दापोली : ए.जी. हायस्कूलच्या कबड्डी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

banner 468x60

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत ए.जी. हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विजयानंतर संघाची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे.


सदर स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये मॅटवर पार पडल्या.
संघाला प्रशिक्षक योगेश खोत, अमित वाखंडे,. प्रथमेश दाभोळे व प्रदीप शिगवण यांचे मार्गदर्शन लाभले.


संघाच्या यशाबद्दल संस्थेचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी, शालेय समिती चेअरमन रविंद्र कालेकर, संचालक मंडळ, मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक अर्जुन घुले, पर्यवेक्षक अनिल पेठकर, मगदूम एस.आय., तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *