दापोली : खळबळजनक, ओळखीच्याच व्यक्तीकडून मुलीवर झाले अनेकदा अत्याचार

banner 468x60

दापोली तालुक्यातील बुरोंडी गावात खळबळजनक घटना समोर आली आहे. दापोली तालुक्यातील बुरोंडीतील एका बंदरगामी गावामध्ये मुलीला धमकावून ओळखीच्याच इसमाने सातत्याने तीन ते चार वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत.

banner 728x90

ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जीवे मारून समुद्रात फेकून देईल अशी धमकी दिल्यामुळे पीडित मुलीने कोणालाही काहीही सांगितले नाही. मात्र आता तक्रार दाखल केल्यानंतर व्यवसायाने मच्छीमार असलेल्या सैफ शफी कडु, रा.बंदर मोहल्ला बुरोंडी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा गुन्हा सप्टेंबर 2024 मध्ये घडला आहे.

मुलीच्या मनाविरुद्ध त्या तरुणाने तीन ते चार वेळा शरीर संबंध ठेवल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी त्या तरुणा विरोधात दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . गावातील तरुणाने मुलीच्या अज्ञान पणाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे

. संबंधित मुलीला दिवस गेल्याने हे प्रकरण उजेडात आले आहे. 22 जानेवारी रोजी मासिक पाळी चुकल्याचे आणि मुलीला उलट्या होऊ लागल्याचे पिडीत मुलीच्या आईच्या लक्षात येताच तिच्या पायाखालची वाळू सरकली आणि आईने सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर ताबडतोब दापोली पोलीस स्थानक गाठलं आणि सर्व प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सैफ शफी कडु आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *