Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दाभोळमध्ये तरुणावर कुत्र्याचा हल्ला, तरुणाच्या मानेला चावा, तरुण गंभीर जखमी

banner 468x60

दाभोळमध्ये सध्या कुत्र्यांचे हल्ले वाढू लागले आहेत. कहीदिवसांपूर्वी 4 नागरिकांवर कुत्र्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या असतानाच आज दाभोळमधील
मणियारवाडी येथे संध्याकाळी इस्माईल मणियार ३३ वर्षीय तरुणावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला करून त्याच्या मानेला गंभीर चावा घेतल्याची घटना घडली.

banner 728x90 banner 728x90

या हल्ल्यात इस्माईल मणियार हा तरुण जखमी झाला असून त्याला तातडीने दाभोळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ही घटना सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. इस्माईल मणियार घराच्या बाहेर उभा असताना भटक्या कुत्र्याने अचानक झडप घालून हल्ला केला. त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्र्याने वारंवार हल्ला चढवला. या झटापटीत इस्माईल खाली पडला आणि त्यावेळी कुत्र्याने त्याच्या मानेला चावा घेतला.


अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याने ग्रामस्थांनी तातडीने यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *