दाभोळ : अपघात झालेल्या दाभोळ मुंबई एसटी बसमधील 41 प्रवासी दरीतून बाहेर कसे पडले EXCLUSIVE VIDEO Accident Kokan Katta News

banner 468x60

मंडणगडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. दाभोळ दापोली मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

हा अपघात रात्री पावणेएक वाजता झाला असून मंडणगडमधील देशमुख बाग,चिंचाळी धरणा जवळ मंडणगड आगारा पासून सुमारे 15 किमी अंतरावर हा अपघात झाला .

दाभोळवरून सुटलेली बसचा बसक्रमांक MH-14-BT-2265 असून अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. दरम्यान ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी ४१ प्रवासी कसे बाहेर पडलेत याचा EXCLUSIVE VIDEO कोकण कट्टा न्यूजच्या हाती आलाय.

हा व्हिडिओ सविस्तर बातमीत दिला आहे. या बसमध्ये दाभोळमधील प्रवासी राशीद परकार यांनी हे व्हिडिओ चित्रित केले आहेत. बसचे चालक गाडे.व्ही.एस असून वाहक भोईर मंदार हिराचंद आहेत. बसमध्ये एकूण 41 प्रवासी होते. दरम्यान अपघातावेळी ७ प्रवासी जखमी झालेत .

बसचे नुकसान झालं असून बस रस्त्याच्या उजव्या बाजूस खाली दरीत 15 फुट जाउन उजव्या बाजूस पलटी झाली. क्रेनच्या साह्याने सदर बस बाहेर काढण्या यश आल आहे.

दरम्यान तातडीची मदत सुरू असून जखमीवर जवळच्या रुग्णयालयात उपचार सुरु आहेत. अपघात झाल्यानंतर मंडणगड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *