दाभोळ : शिक्षकच बनला भक्षक ! शिक्षकानेच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 46 वर्षीय नराधम शिक्षकाचं कृत्य

banner 468x60

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना दाभोळमध्ये घडली आहे. दापोली तालुक्यातील दाभोळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय . दाभोळमध्ये एका जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने ५ वीत शिकणाऱ्या मुलीसोबत अतिप्रसंग करून अत्याचार केला आहे.

Kokan News Update Whatsap group Join : https://chat.whatsapp.com/DJBXrCrkrKv4tQLrS689uf?mode=ac_c

banner 728x90

गुरू-शिष्याच्या नात्याला पवित्र समजले जाते. मात्र, या नात्याला किशोर काशिराम येलवे या हैवान शिक्षकाने कलंक लावलाय. रा. आगरवायंगणी बौध्द वाडी, ता. दापोली, वय वर्ष ४६ हा दाभोळजवळाच्या आगरवायंगणी या ठिकाणी राहत असून दाभोळमधील जिल्हा परिषद शाळेत शिकवतो.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, ही घटना घडली आहे दाभोळमध्ये साधारण ४ ते ५ च्या दरम्यान घडली. नेहमीप्रमाणे अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जाण्यासाठी निघाली असताना शाळेतील शिक्षकानेच या मुलीला विचारलं तुला न्यायला कोणी नाही का आलं मुलीने नाही सांगताच मी तुला घरी सोडतो म्हणून आपल्या बाईकने किशोर येलवेने या १० वर्षीय मुलीला बाईकने घेऊन घरी सोडण्यास गेला.

यावेळी या मुलीच्या घरी कोणीच नसल्याने किशोर येलवे हा देखील त्या मुलीच्या मागोमाग गेला घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की घरी कोणी नाहीय
घरी कोणी नसल्याचा फायदा उचलून त्यांनी अल्पवयीन मुलीवर अतीप्रसंग केलाय. या नराधमाने मुली समान असलेल्या अल्पवयीन मुलीच्या शरीरावर हात फिरवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. झालेला प्रकार कोणालाही सांगू नको अशी धमकी या शिक्षकाने मुलीला दिली. मुलगी घाबरून तिथून गेल्यावर या हैवान शिक्षकाने तिथून पळ काढला मात्र झालेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली.

तिने सर्वकाही शेजारी असलेल्या कुटुंबांला सांगितलं त्यानंतर हा सर्व प्रकार आई आणि वडिलांना सांगितला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकाने दुसऱ्यांदा या मुलीला सोडण्यासाठी आलेला होता अशी माहिती पुढे आली आहे. याआधी देखील याच शिक्षकाने या मुलीला सोडण्यासाठी घरी आला होता .

पुढे पीडितेच्या पालकांनी दाभोळ पोलीस स्थानक गाठत शिक्षकावितोधात तक्रार दाखल केली. दाभोळ पोलिसांनी शिक्षक किशोर येलवेला अटक केली असून पॉस्को Pocso कायद्याचे कलम 8/10 आणि बीएनएस ७४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

यामध्ये कोणत्याही मुलाचे लैंगिक शोषण झाल्यास, ते कलम ८ अंतर्गत गुन्हा ठरतो, तर एखाद्या मुलीचे लैंगिक शोषण झाले असेल, तर कलम १० नुसार, दोषी व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीषक अमोल गोरे करत आहेत. दरम्यान आरोपीला दापोलीत नेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *