दाभोळ : राहत्या घरी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील दाभोळ जवळील पणदेरी (बौद्धवाडी) येथील नितिन शंकर कांबळे (वय ३९) या व्यक्तीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी उघडकीस आली.


प्राथमिक माहितीनुसार, नितिन कांबळे हे काही काळापासून मानसिक अस्वस्थतेने त्रस्त होते. काल दुपारी १.३० ते २.३० या दरम्यान त्यांनी घरातील बेडरूममध्ये लाकडी भाल्यावर नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.


घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी दाभोळ पोलिसांना खबर दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी तपास अधिकारी संबंधित कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी करत आहेत.
नितिन कांबळे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *