दाभोळ : हमद बिन जासिम आयटीआय दाभोळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

banner 468x60

हमद बिन जासिम औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दाभोळ यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.

banner 728x90 banner 728x90


या कार्यक्रमास संस्थेचे संचालक कमाल मांडलेकर, लईक महालदार, मुश्ताक मालगुंडकर व तन्वीर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मौलिक मार्गदर्शन केले.


सीबीटी बोर्ड परीक्षा 2025 मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. यामध्ये इलेक्ट्रिशन ट्रेडमधून कु. साईनाथ बाळकृष्ण देसाई यांनी 93.83% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कु. प्रसाद मनोहर जांगळी यांनी 92.66% गुणांसह द्वितीय क्रमांक, तर कु. उत्कर्ष विलास घाडे यांनी 90.00% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश रहाटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *