दाभोळ : ए. के. आय. हायस्कूल, दाभोळ येथे फज्जलुद्दीन जमालुद्दीन बामणे यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती

banner 468x60

ए. के. आय. हायस्कूल दाभोळ येथे फज्जलुद्दीन जमालुद्दीन बामणे यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्याध्यापक शब्बीर उमर वलेले यांच्या निवृत्तीनंतर ३१ जानेवारी २०२५ पासून ही पद रिक्त होते.

शाळा ५ वी ते १० वी पर्यंत असून सध्या एकूण १४२ विद्यार्थी आणि ११ शिक्षक व कर्मचारीवर्ग कार्यरत आहेत. बामणे हे मागील ३५ वर्षांपासून सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असून प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे त्यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे मन जिंकले आहे.

त्यांच्या दीर्घ सेवाकाळातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत अॅड. एम. ए. के. आय. ट्रस्टच्या मुख्य कार्यालयाने त्यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, हे त्यांचे शेवटचे सेवावर्ष असून आगामी कार्यकाळासाठी ट्रस्ट सदस्यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे.

या नियुक्तीनिमित्त शाळा परिवार, ट्रस्ट सदस्य तसेच स्थानिक नागरिकांकडून बामणे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *