दापोली-दाभोळ मुख्य रस्त्यावर २४ जुलै रोजी
सकाळी भीषण अपघात होता होता टळला. प्रवाशांनी भरलेली एसटी बस रस्त्याच्या कडेला साईड देताना अचानक साईड पट्टी खचली आणि बस थोडक्यात पलटी होण्यापासून वाचली.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र, या प्रकारामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे अधिकारी जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. रस्त्यांचे काम अत्यंत हलक्या दर्जाचे असून, निरीक्षण आणि देखरेख पूर्णपणे दुर्लक्षित केली जात असल्याचा गंभीर आरोप स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि समृद्ध कोकण संघटनेचे अनिष निंबकर यांनी दापोली बांधकाम विभागावर केला आहे.

या घटनेनंतर निंबकर यांनी तात्काळ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “प्रशासनाने आता तरी जागं व्हावं आणि अशा निष्काळजीपणाच्या घटना थांबवाव्यात,” असे ते म्हणाले.

दरम्यान, या मार्गावर वारंवार होणारे खड्डे, अपूर्ण साईड वर्क आणि दर्जाहीन डांबरीकरणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहून रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















