नॅशनल हायस्कूल मांदिवली येथे सायबर सुरक्षा कार्यक्रम संपन्न

banner 468x60

दि यंग पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नॅशनल हायस्कूल मांदिवली येथे सायबर सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

कार्यक्रम अध्यक्षस्थानी इंग्लंड मधील साउथंमटन विद्यापीठ कार्यालयात सेवा करीत असलेले खालीद परकार हे होते. मुस्तकिम मुकादम याने कुराण पठण केले.

तोसीफ मुकादम याने हमद, इरहम फकी हिने नात सादर केली. खालीद याचे स्वागत करताना शाळेचे मुख्याध्यापक फैयाज सर यांनी आजकाल विद्यार्थी इंटरनेट व मोबाईल मुळे होणाऱ्या दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर इंग्लंड मधील सेवा करणाऱ्या खालीद परकार याने सायबर सुरक्षाची संकल्पना, सायबर हल्ला प्रकार व पध्दत, सुरक्षा उपाय अतिशय तपशीलवार प्रभावी पध्दतीने मांडले.

तसेच विद्यार्थ्याने इंटरनेट किती वापरावे, सोशल मिडीयाचा वापर करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दयावे याबाबत चर्चा केली.

त्याचे आजोबा डाॅ.परकार, वडील अरशद, आई तब्बसूम, काका मजहर, आजोबा इक्बाल मुकादम, अब्दुल हमीद मुकादम, आजी शाहजहान मुकादम यांचे त्याला लंडन मध्ये सायबर सुरक्षा विषयामध्ये मास्टर डिग्री घेण्यासाठी प्रोत्साहित केले होते. कार्यक्रम सूत्रसंचालन जमादार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेबददल संस्था अध्यक्ष उस्मान मालवणकर, उपाध्यक्ष डाॅ.अजीज सावंत, सचिव अ.कादीर खांचे, सहसचिव अस्लम जुवळे, शालेय समिती चेअरमन नूर मोहम्मद मुकादम, व्हाईस चेअरमन इक्बाल मुकादम, सदस्य जमालुददीन मुकादम, गुलाम हुसैन भारदे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष मेहबूब मुकादम यांनी अभिनंदन केले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *