Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दापोली : श्रद्धा ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाविरोधात अधिकचे पैसे मागितल्या प्रकरणी, तहसील कार्यालयात तक्रार दाखल

banner 468x60

दापोली – दापोली-दाभोळ रोडवरील श्रद्धा ऑटोमोबाईल पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरताना ग्राहकाकडून अधिकचे पैसे मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जालगाव (ता. दापोली) येथील राजाराम रामा जालगावकर यांनी तहसील कार्यालयाकडे लिखित तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली.

banner 728x90 banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी जालगावकर हे आपल्या दुचाकी (क्र. MH08 3343) मध्ये पेट्रोल भरण्यासाठी श्रद्धा ऑटोमोबाईल पेट्रोल पंप येथे गेले होते. तेव्हा पंपवरील ऑपरेटरने त्यांना ४९९ रुपये किमतीचे पेट्रोल भरल्याचे सांगितले. मात्र जालगावकर यांनी पावती मागितल्यावर पावतीवर फक्त ₹४३९.९३ एवढेच बिल नोंदवलेले आढळले — म्हणजेच सुमारे ₹६० रुपयांची अधिक मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.


याबाबत त्यांनी तत्काळ पंपावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र तेथून कोणतीही दाद न मिळाल्याने अखेरीस त्यांनी दापोली तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे लिखित तक्रार दाखल केली आहे.


या घटनेनंतर तहसील कार्यालय आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. पुरवठा विभाग पुढील कारवाई कशी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशा प्रकारे बऱ्याच पेट्रोल पंपावर आपली फसवणूक होऊ शकते तरी आपण सावध राहून काळजी घेणे गरजेचे आहे.

काही दिवसापूर्वी दापोलीतील आणखी एका पंपावर बाहेरील डिजिटल बोर्ड वरती प्राईज वेगळी आणि पंपाच्या मशीन वरती प्राइस वेगळी होती त्याची त्यांना जाणीव करून दिलेली आहे. बऱ्याच ठिकाणी पेट्रोलची क्वालिटी ही चेक करायला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *