चिपळूणमधील मिरजोळी ग्रामपंचायत सदस्या वृषाली राजेश कदम यांच्या घराला अतिवृष्टीमुळे धोका निर्माण झाला असून, घराला भेगा पडल्या आहेत. घराची अशी अवस्था झाल्यामुळे कदम कुटुंबीय सध्या भीतीच्या छायेखाली आहेत.

मिरजोळीचे सरपंच कासम दलवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून चिपळूण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मिरजोळी येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

याच अतिवृष्टीमुळे ग्रामपंचायत सदस्या वृषाली राजेश कदम यांच्या घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. घराची झालेली ही अवस्था पाहता, त्यांना मदतीची नितांत गरज आहे.
या घटनेमुळे

परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन कदम कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी मिरजोळीचे सरपंच कासम दलवाई यांनी केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















