चिपळूण : घरच्या अंगणातून दुचाकी चोरली

banner 468x60

सावर्डे तालुक्यातील वहाळ ब्राम्हणवाडी येथे घरातील अंगणातून दुचाकी चोरीस गेल्याची घटना २० मार्च रोजी रात्रौ 11.30 वा ते २१ मार्च रोजी सकाळी 7.30 वा चे सुमारास घडली. याबाबतची फिर्यादी सुमित सुरेश पाध्ये (३७ वर्षे, व्यवसाय किराणा दुकान रा. वहाळ ता. चिपळुण ) यांनी पोलीस ठाण्यात दिली.

त्यानुसार अज्ञतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित सुरेश पाध्ये यांनी आपल्या अंगणात शाईन मोटार सायकर (क्र. एम.एच ०८ एएम ३०१९) ही २० मार्च रोजी रात्रौ अंगणात उभी करुन ठेवलेली. कोणीतरी अज्ञात चोरच्याने ही दुचाकी चोरून नेली. त्यांचे 35 हजारांचे नुकसान झाले.

याप्रकरणी अज्ञातवर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *