Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

चिपळुण : धक्कादायक – डंपरचे चाक तरुणीच्या पोटावरून गेल्याने जागीच मृत्यू

banner 468x60

चिपळूण-कराड मार्गावर खेर्डी येथे आज बुधवारी दुपारी 3.30 वाजता डंपरने एका दुचाकीस्वार महिलेला चेंडूसारखे उडवले. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. समीना नासिम चिपळूणकर (28, खेर्डी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर तिचे वडील आदम चौगुले हे जखमी झाले आहेत.

banner 728x90 banner 728x90

अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. अपघातानंतर या ठिकाणी गर्दी झाली होती. समीना नासिम चिपळूणकर या आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून प्रवास करत होत्या.

खेर्डी बाजारपेठजवळ असलेल्या एका कॉम्प्लेक्ससमोर त्यांच्या दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत समिना डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्यांच्या पोटावरून चाक गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील आदम चौगुले हे जखमी झाले.

अपघातानंतर डंपर चालक तेथून फरार झाला. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे.

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *