Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

चिपळूण : नोकरीचे आमिष दाखवून 13 लाखांची फसवणूक

banner 468x60

चिपळूण शहरानजीकच्या कळंबस्ते येथे राहणार्‍या 59 वर्षीय व्यक्तीसह अन्य एकाची तुम्हाला नोकरी लावतो असे सांगून तब्बल 13 लाख 24 हजार 800 रुपयांची फसवणूक केली आहे.

banner 728x90 banner 728x90

या प्रकरणी शरद विजयकुमार पवार (रा. करंजे, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 15 मार्च2024 ते 11 जुलै 2024 या कालावधीत कळंबस्ते येथे घडली.

त्यानुसार सुभाष भगवान घाडगे (59, रा. कळंबस्ते फाटकाजवळ, मूळ रा. तुळशी, ता. सोलापूर) यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. यातील शरद पवार याने नोकरी लावतो, असे सांगून सुभाष घाडगे यांची 9 लाख 4 हजार 800 रुपये व शेषराव येनाजी राठोड यांची 4 लाख 20

हजार अशी एकूण 13 लाख 24 हजार 800 रुपयांची नोकरी लावतो, असे आमिष दाखवून फसवणूक केली. यासंदर्भात सुभाष घाडगे यांनी तक्रार दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *