चिपळूण : TWJवर चिपळूणमध्ये दुसरा गुन्हा दाखल, 28 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक, गुहागर आणि चिपळूणमधील 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूणमध्ये TWJ ट्रेड विथ जॅझ असोसिएट प्रा.लि. कंपनीवर दुसरा गुन्हा चिपळूणमध्ये दाखल झाला आहे. पहिला गुन्हा यवतमाळ शहरातील चौघा गुंतवणूकदारांची तब्बल 39 लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर, या कंपनीने एकूण ३ कोटी ३१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

banner 728x90

या घटनेमुळे राज्यभरातील गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून, आता दुसरा गुन्हा हा चिपळूणमध्ये दाखल झाला आहे.

‘फ्रेंचायझी बिझनेस अॅग्रीमेंट’च्या नावाखाली अधिक परताव्याचे आमिष दाखवून राज्यभरातील अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

चिपळूण तालुक्यातील कामये माटेवाडी येथील ठेकेदार प्रतिक दिलीप माटे (वय २९ वर्षे) यांच्यासह त्यांच्या बहिणीची तब्बल २८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुहागर आणि चिपळूणमधील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


1.समीर सभाष नार्वेकर, रा. गुहागर
2.नेहा समीर नार्वेकर, रा. गुहागर
3.संकेश रामकृष्ण घाग, रा. चिपळूण
4.सिध्देश शिवाजी कदम, रा. कामथे, ता. चिपळूण यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गुन्हा क्रमांक २१६/२०२५ २२ सप्टेंबर २०२५, रात्री ९.३८ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६(२), ३१८(२), ३१८(४), ३(५) गुन्हा दाखल झाला आहे. चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून कंपनीकडून ठेकेदाराची आर्थिक फसवणूक झाली आहे.

आरोपींनी “TWJ असोसिएट कंपनी” या नावाने गुंतवणूकदारांना दरमहा ३ ते ४ टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवले. कंपनीचे ऑफिस चिपळूण येथील इंटक भवन, पागमव्य येथे सुरू असल्याचे दाखवण्यात आले. फिर्यादी प्रतिक माटे यांनी ३ लाख ५० हजार रुपये, तर त्यांच्या बहिणी तृप्ती दिलीप माटे हिने २५ लाख रुपये या कंपनीत गुंतवले.

जानेवारी २०२३ पासून काही काळ परतावा दिल्यानंतर मे २०२५ नंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न केल्याने फिर्यादीची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे.

दरम्यान अजून किती गुंतवणूकदार पुढे येऊन तक्रार दाखल करणार हे पाहावं लागणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *