चिपळूणात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. चिपळुणात मुंबई-पुण्यासारख्या धक्कादायक ‘हिट अँड रन’ घटनांना सुरुवात झाल्याचा प्रकार आज बुधवारी काविळतली येथे घडला.

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याच्या मुलाने अभिजीत जयंत खताते याने इनोवा क्रिस्टा गाडीने पादचारी व्यक्तीला उडवले आहे.
या कारने एका प्रौढ पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात रमेश कळकुट्टी (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेला असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी झाली होती.

या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी चालक पळ काढत असल्याने ‘नेत्यांच्या मुलांना कायद्याचा धाक नाही का?’ असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या अपघातामुळे कोकणातही बिनधास्त गाडी चालवण्याच्या प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याची टीका होत आहे.
पोलिसांनी आरोपी चालकाला तात्काळ अटक करावी, अशी मागणी होत असून, नागरिकांनी अपघातानंतर काही काळ रस्ता रोखून ठेवत निषेध व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















