चिपळूण तालुक्यातील आलोरे देवरेवाडी येथे घरात एकट्या असलेल्या एका महिलेक्या घरावर चार जण चाल करुन आले आणि दरवाजा उघडला नाहीस तर तुला ठार मारू असं अशी धमकी देत खिडकीत मधूनच त्या महिलेवर सुरा फेकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
ही घटना चिपळूण तालुक्यातील अलोरे देवडे देवडेवाडी येथे 20 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये चारही जण अनोळखी असल्याचं तिने म्हटले आहे.
हे चारही जण 20 ते 25 वयोगटातले असून अंगाने सावळे आणि त्यांच्या सगळ्यांच्या अंगात काळा शर्ट होता. तर त्यांच्या तोंडाला मास्क होता त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. ही महिला घरी असताना ही चार अज्ञात अनोळखी माणसं घराबाहेर आली आणि त्यांनी महिलेच्या घराचा दरवाजा जोर जोरात वाजवायला सुरुवात केली.
दरवाजा उघडला नाहीस तर तुला ठार मारू अशी धमकी देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यातीलच एकानं महिलेच्या घराच्या खिडकी खाली असलेल्या गवत कापण्याचा सुरा उचलला आणि खिडकीतुनच तो त्या महिलेच्या अंगावर फेकून मारला.
मात्र हा सुरा महिलेने चुकवला त्यामुळे तो त्यांना लागला नाही. यादरम्यानच मोठ्या धाडसाने चाकू फेकून मारणाऱ्या त्या व्यक्तीचा हात खिडकीच्या आत आल्याने महिलेने तो हात पकडला. यात मोठी झटापट झाली आणि त्या हल्लेखोरांच्या हाताला मोठ्या प्रमाणात खरचटंल.
दरम्यान हे सगळं घडत असतानाच चौघांपैकी दोघजणांनी महिलेच्या घराच्या पाठीमागच्या दरवाजाला जाऊन त्याचा दरवाजा ठोठवण्यास सुरुवात केली. जोरजोरात दरवाजा वाजवत, दार उघड, दरवाजा नाही उघडल्यास तुला ठार मारू अशी धमकी दिली. बराचवेळ हा प्रकार सुरू होता. त्यानंतर चौघेही पळून गेले.
मात्र एका महिन्याच्या घरावर भर दिवसा असा हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून रत्नागिरी जिल्ह्यात खरंच महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
याप्रकरणी अलोरे पोलीस स्थानकामध्ये भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 124, 351 (2), 3 (5 ) प्रमाणे चार अज्ञातविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र यातून पोलीस या चौघांना पकडणार कसे, हे चौघही स्थानिक होते का, की परजिल्ह्यातून किंवा राज्यातून रत्नागिरीमध्ये आले होते आणि या महिलेवर हल्ला करण्यामागचा त्यांचा हेतू कोणता होता असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले असून आहेत.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*