चिपळूण : जुगार खेळण्याचा नवा केंद्र, सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 12 जणांवर गुन्हा

banner 468x60

सोमवारी पेठमाप येथील वाशिष्ठी नदी किनारी सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या तरुणांवर मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी १२ तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाशिष्ठी नदी किनारी जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. नावेद फैसल शेख (२३), सलमान अब्दुल रज्जक अलवी (३१), शरफुद्दीन इरफान जबले (२५), गुलाम मोहम्मद लांडगे (२३), मुईन अब्दुल रफिक तांबे (२३), मोहम्मदसैफ अमनऊल्ला लांडगे (२१), जाईद अफरोज परकार (२१), दानिश अस्लम लांडगे (२७ सर्व गोवळकोट रोड), नेहाल इम्तीहाज सुर्वे (३१), आमीर मुकबूल सुर्वे (२९, दोघे-उक्ताड), बाशीद लियाकत कादरी (३२), आदिल फिरोज रुमानी (२६ दोघे-पेठमाप) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबतची फिर्याद अजित संतोष कदम (चिपळूण पोलीस ठाणे) यांनी दिली आहे. शहरातील पेठमाप परिसरातील वाशिष्ठी नदीकिनारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी वरील गुन्हा दाखल झालेले सर्वजण ५२ पानी पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत होते.

याबाबतची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या तरुणांवर धाड टाकत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. कारवाईनंतर आलेल्या राजकीय दबावाला न राहता पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

पोलिसांच्या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्या तरुणांवर चांगलीच वचक बसली असून कारवाईतील काही तरुणांनी परदेशात जाण्यासाठी व्हिसाही काढल्याची माहिती पुढे येत आहे.


७ जानेवारी रोजी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर वाशिष्ठी नदी किनारी एका घरामध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल करून ३ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

हे दोन्ही प्रकार वाशिष्ठी नदी किनारीच घडले. नदी किनार परिसर नव्याने जुगार खेळण्याचे केंद्र बनले की काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *