कुंभार्ली येथील नदीत चिंब भिजण्यासाठी गेलेल्या 8 विद्यार्थ्यांपैकी दोघेजण बेपत्ता झाले होते. त्या दोघांचे मृतदेह शिरगाव येथीलवाशिष्ठी नदीत सापडले आहेत.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
तब्बल 24 तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश आले आहे.रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारासकुंभार्ली येथे वाशिष्ठीच्या डोहात ही दुर्घटना घडली. सहा मुलांनी भिजल्यानंतर काही वेळात पाऊस आल्याने जवळच्या छपराखालीआसरा घेतला.
मात्र, कादिर लसणे व आतिक बेबल हे दोघे याच ठिकाणी डोहात थांबले. मात्र, काही वेळाने वरच्या बाजूला जोरातपाऊस झाल्याने मोठे पाणी आले. यावेळी हे दोघे पाण्यात बुडाले. वाचवा–वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेलीती सहा मुले धावली. मात्र, तोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते.
या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडेधाव घेतली. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. रात्री उशिरा पाऊस व अंधारामुळे शोधकार्य राबविणे शक्य झाले नाही. सकाळच्यावेळी महाड येथून प्रशांत साळुंखे यांच्या रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू करण्यात आले.
यानंतर जयगड येथून कोस्टगार्डची टीमहीदुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कुंभार्ली येथे दाखल झाली आणि त्यांनीही ऑक्सीजन व कॅमेरे लावून डोहात उतरून शोधकार्य सुरूकेले. मात्र, उशिरापर्यंत डोहामध्ये मृतदेह सापडत नव्हते. या टीमने खूप प्रयत्न केले.
घळीमध्ये बांबू टाकून देखील पाहण्यात आले. मात्र, मृतदेह सापडले नाहीत. यानंतर पुन्हा एकदा नदीपात्रालगत शोध मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी 4 वाजण्याच्यादरम्यान यातील एका विद्यार्थ्याचा मृतदेह शिरगाव येथील वाशिष्ठी नदीत आढळला. त्यानंतर दुसर्याचा शोध सुरू झाला आणि5:30 वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील नदीतच पात्राच्या किनार्यावर दुसर्या मुलाचा मृतदेह आढळला.
यानंतर हे शोधकार्यथांबले. दोन्ही मृतदेह शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह पालकांच्याताब्यात देण्यात येणार आहेत.
शाळेला सुट्टी असल्याने मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये शिकणारे इयत्ता दहावीतील आठ विद्यार्थी नदीत चिंबभिजण्यासाठी गेले होते.
मात्र, घरामध्ये त्यांनी आपण फूटबॉल खेळायला जातो असे सांगितले होते. यामध्ये इब्राहिम काजोरकर(गोवळकोट), अब्रार हुसेन आंचरेकर (गोवळकोट), फरहान हिदायत पिलपिले (खाटीक आळी चिपळूण), अली नियाज सनगे (रा. बेबल मोहल्ला), जहिद हनीफ खान (रा. कोंढे चिपळूण), आरमान अजीज खान (रा. भेंडीनाका चिपळूण), आतीक इरफान बेबल(रा. बेबल मोहल्ला, अब्दुल कादीर नौशाद लसणे (रा. जिव्हाळा सुपर बाझार) हे विद्यार्थी भिजण्यासाठी नदीवर गेले होते.
मात्र, त्यातील दोघेजण बुडाल्याने चिपळूण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील चिपळुण तालुका मुस्लीम संघटनेचे अध्यक्ष नाझीमअफवारे, शाहनवाज शाह तसेच शिरगाव व चिपळूण पोलिस यांनी घटनास्थळी शोधकार्य सुरू केले.
सोमवारी (दि.10) सकाळीजेसीबी पाठवून डोहाकडे येणारे नदीचे पाणी तीन बांध घालून वळविण्यात आले. तसेच डोहामध्ये साचलेले पाणी बाहेरकाढण्यासाठी प्रवाह निर्माण करण्यात आला. त्याआधी महाड येथील रेस्क्यू टीम, काही स्थानिक ग्रामस्थ यांनी शोधण्याचा प्रयत्नकेला. मात्र, हाताला काही लागले नाही.
जयगड येथील कोस्टगार्डच्या टीमनेही प्रयत्न केला. मात्र, सायंकाळच्या सुमारास शिरगावयेथील नदीपात्रात कादिर लसणे व आतिक बेबल या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले. कुंभार्ली येथील हा डोह प्रसिद्ध आहे.
स्थानिक म्हणजेच अलोरे, शिरगाव, पोफळी, कुंभार्ली आदी गावातील मुले या ठिकाणी पोहत असतात. मात्र, स्थानिकांना येथीलपाण्याचा अंदाज असतो. चिपळुणातून पोहण्यासाठी गेलेल्या या दहावीतील विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात दोघेबुडाले.
त्यांचा शोध घेण्यासाठी एका सत्तर वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाही विचार न करता या डोहात उडीघेतली. त्यांनी अनेकवेळा या ठिकाणी उडी घेऊन अनेकांना वाचविल्याचे सांगितले जाते. मात्र, वयोमानानुसार त्यांनाही दमछाकझाल्याने ते बाहेर आले.
यानंतर त्यांचा मुलगा गणेश थरवळ यानेदेखील डोहात उडी मारून शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यशआले नाही. माञ पाण्याचा वेग जास्त असल्याने दोघांनाही ही मुलं सापडली नाहीत. कुंभार्ली येथील हा डोह प्रसिद्ध आहे.
स्थानिकम्हणजेच अलोरे, शिरगाव, पोफळी, कुंभार्ली आदी गावातील मुले या ठिकाणी पोहत असतात. मात्र, स्थानिकांना येथील पाण्याचाअंदाज असतो.
चिपळुणातून पोहण्यासाठी गेलेल्या या दहावीतील विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात दोघे बुडाले.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*