चिपळूण शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील उक्ताड येथे एका इमारतीवरुन पडलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिद्री अशफाक घारे (16, निवसेकर हाईट्स,- उक्ताड) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्री 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास शहरातील उक्ताड- कानसेवाडी येथे असलेल्या निवसेकर हाईट्स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती.
तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने तीचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















