चिपळुण : एकाला मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूण शहरातील भोगाळे येथे एकाला दोघांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली.

banner 728x90 banner 728x90

यात एकजण जखमी झाला असून तिघांवर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उमेश मधुकर जामसुदकर (४९), सौरभ उमेश जामसुदकर (२०), नीलेश मधुकर जामसुदकर (४४, तिघे-मुरादपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद निवास गुलाब लोंढे (५०, शंकरवाडी) यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवास लोंढे हे भोगाळे येथील दर्गाजवळ दर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणी उमेश जामसुदकर हा मद्यप्राशन करुन पडला होता. त्याने निवास लोंढे यांना ‘दर्गा माझा आहे, तुम्ही येथे यायचे नाही’ असे सांगितले.

त्यानंतर निवास लोंढे यांच्या घरी जाऊन उमेशचा मुलगा सौरभ तसेच नीलेश जामसूदकर यांनी शिवीगाळ केली. यानंतर निवास लोंढे पुन्हा दर्गाजवळ बुधवारी गेले असता त्या ठिकाणी पाया पडून रात्री १०.३० च्या दरम्यान बाहेर पडत असताना उमेश व सौरभ यानी त्यांना मारहाण केली. यात ते जखमी झाले. या प्रकरणी त्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *