चिपळुण : ठेकेदाराला कारमधून उतरवून बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

Screenshot

banner 468x60

चिपळूण शहरालगतच्या बायपास रोडवरील लेणी परिसरात ठेकेदार अनिल मारुती चिले (58, पाचाड) यांच्यावर तिघा अज्ञात व्यक्तींनी फिल्मी स्टाईल हल्ला चढवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या हल्ल्यात चिले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

banner 728x90


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल चिले हे रात्री सुमारास 9.10 च्या दरम्यान आपल्या कारने गुहागर बायपास मार्गाने घरी जात होते. लेणी परिसरातील एका वळणावर ते पोहोचताच त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका दुचाकीवर तिघा अनोळखी व्यक्तींनी कारचा घेराव केला. दुचाकी आडवी लावून त्यांनी चिले यांना थांबवले.


त्यापैकी एकाने ‘आमच्या दुचाकीला डॅश देऊन पळ काढताय काय?’ अशी धमकीवजा भाषा केली, तर इतर दोघांनी ‘खाली उतरा’ असा आग्रह धरला. चिले यांनी शांतपणे, “डॅश झाली असेल तर मी नुकसानभरपाई देण्यास तयार आहे,” असे सांगितले; मात्र त्या तिघांनी त्यांना कारमधून बाहेर ओढून रस्त्यावर पाडले आणि बेदम मारहाण केली.
मारहाणीनंतर आरोपी तेथून फरार झाले. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तिघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *