चिपळूण शहरात वादग्रस्त सोशल मीडिया रील्समुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. चिपळूण येथील नगर परिषदेच्या परिसरात असलेल्या ‘हाशिम फॅशन’ या कपड्यांच्या दुकानात विक्रीस ठेवलेल्या ड्रेसच्या जाहिरातीवरून हा वाद उफाळून आला.
दुकानाकडून “पाकिस्तानी फॅशनचे कपडे उपलब्ध” अशा आशयाची रील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली होती. ईदच्या पार्श्वभूमीवर विक्री वाढवण्याच्या उद्देशाने ही रील तयार करण्यात आली होती. मात्र काही वेळातच ही रील व्हायरल झाल्यानंतर शहरातील काही स्थानिक तरुणांनी संताप व्यक्त करत संबंधित दुकानात जाऊन दुकानदाराला जाब विचारला.
यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद वाढला आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी दोन्ही बाजूंनी चिपळूण पोलीस ठाणे येथे परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आपल्याला कोणतीही मारहाण झालेली नसल्याचा दावा संबंधित दुकानदाराने केला आहे. त्यामुळे घटनावेळी उपस्थित तरुणांकडून दुकानदाराला मारहाण झाली की नाही, याबाबत सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














