चिपळुण : भटक्या कुत्र्यांचा शाळकरी मुलीवर हल्ला

banner 468x60

चिपळूण शहरातील खेंड भागातील संसारे नाका परिसरात शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एका १० वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा थोडक्यात बचाव झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner 728x90 banner 728x90


संसारे नाका परिसरात राहणाऱ्या एका महिलेने मोठ्या प्रमाणात कुत्र्यांना खाद्य पुरवल्यामुळे येथे २० ते २५ भटके कुत्रे कायमस्वरूपी तळ ठोकून आहेत. ही कुत्री ये-जा करणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत.


शनिवारी सकाळी संबंधित विद्यार्थिनी शाळेत जात असताना कुत्र्यांच्या टोळक्याने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळच असलेल्या चार ते पाच नागरिकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून नगर परिषदेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *