अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासह मदतकार्य राबविण्यासाठीची प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. त्याकरिता पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (एनडीआरएफ) तुकडी मंगळवारी चिपळूण शहरात दाखल झाली.
पूरस्थितीत बचावकार्यासाठी आवश्यक ती तयारी केली जात आहे. त्यासाठीच ही तुकडी दरवर्षीप्रमाणेच यंदाही चिपळुणात आली आहे. या तुकडीमध्ये दोन अधिकारी आणि २३ जवान आहेत.
पूरपरिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांच्याकडून मदत कार्य केले जाणार आहे. येथे २०२१ मध्ये आलेल्या महापुरात अतोनात नुकसान झाले. त्यावेळी एनडीआरएफच्या तुकडीची गरज प्राधान्याने पुढे आली. त्या महापुरानंतर दरवर्षी एनडीआरएफची तुकडी पावसाळ्यात चिपळुणात येत आहे. यावर्षी मे महिन्यातच दमदार पावसाला सुरुवात झाल्याने तातडीने एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे.
गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्या धर्तीवर येथे एनडीआरएफची तुकडी मंगळवारी सकाळीच दाखल झाली.
या तुकडीमध्ये २ अधिकारी व २३ जवानांचा समावेश आहे. शहरातील कापसाळ येथील विश्रामगृहात त्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या तुकडीने मोटार बोटसह इतर आवश्यक बचावकार्याच्या साधनांनी उपलब्धता केली आहे. काही साधने नगर परिषदेने उपलब्ध केली आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*