दापोली तालुक्यातील चिखलगाव येथील लोकसाधना संस्थेचा वार्षिक वर्धापन दिन कार्यक्रम 1 ऑगस्ट 2025
शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला. लोकसाधना या सामाजिक-सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थेचा 42 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून रुबी हॉल क्लिनिकच्या आयसीयू प्रमुख प्रतिथयश डॉक्टर, चिकित्सक, अनेक पुरस्कार सन्मानित डॉ प्राची साठे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.

त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात लोकसाधनेच्या विविध उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आणि संस्थेने गेल्या चार दशकांत करीत आलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.


कौशल्य या विषयावर “कौशल्य साधना” या हस्तलिखिताचं प्रकाशन डॉ प्राची साठे यांच्या हस्ते झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीते, नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले.

चिखलगाव येथील रामकृष्ण सभागृहात आयोजित समारंभाला संस्थेचे संस्थापक, शिक्षकवर्ग, विस्तार अधिराकारी पवार मॅडम, केंद्रप्रमुख. बैकर सर, चिखलगावचे सरपंच दिनेश आडविलकर, विश्वस्त नितांत माटे, विद्यार्थी, परिसरातील मान्यवर, माजी सदस्य आणि पालकांची उपस्थिती होती. समारंभाच्या समाप्तीला उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















