दापोली : बोरीवली येथील घरावर कोसळले नारळाचं झाड, घराचे मोठे नुकसान, जीवितहानी टळली

banner 468x60

दापोली शहरात रात्रीपासून मुसळधार पाउस सुरु
आहे. मुसळधार पावसामुळे बोरीवली आडीवाडी परिसरातील रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

सोसाट्याच्या वा-यामुळे शंकर रेवाले यांच्या घरावर नारळाचं झाड कोसळल्याची घटना घडली. घरी कोणीही नसल्याने या दुर्घटनेत जीवितहानी अथवा जखमी कोणी झालेलं नाही मात्र शंकर रेवाले यांच्या घराचे मोठं नुकसान झाले.

सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, पावसाचे पाणी घरात गेल्याने घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरावरील झाड काढण्यासाठी गावातील नितीन रेवाले,सागर गोवळे,दिलीप मांडवकर,संजय देपोलकर ,हरी बैकर, पांडुरंग बोरघरे यांनी सहकार्य केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *