कोकणच्या निसर्गरम्य भूमीत, चिपळूणच्या एका पाणथळ भागात पक्षी निरीक्षक डॉ. श्रीधर जोशी यांच्या कॅमेऱ्यात एक अद्वितीय क्षण कैद झाला, भारतात आजवर न पाहिलेल्या ‘ब्लॅक हेरॉन’ या आफ्रिकन पक्ष्याचे दोन प्रतिकृती चक्क मासे पकडताना!
ही घटना केवळ चिपळूणसाठी नव्हे, तर संपूर्ण भारतीय पक्षी अभ्यासजगतातील ऐतिहासिक नोंद ठरली आहे. रविवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळच्या फेरफटीत डॉ. जोशींनी एका पाणथळ जागी दोन काळे बगळे पाहिले. त्यांनी विशिष्ट canopy feeding (छत्री feeding) शैलीने मासे पकडताना दिसले.
सावली निर्माण करून मासे खेचून पकडण्याची ही नजरेने दिपवणारी शैली जगात फक्त Black Heron – Egretta ardesiaca या आफ्रिकन पक्षातच आढळते, हे त्यांच्या लक्षात आले.
संशोधन आणि खात्रीचा प्रवास
डॉ. जोशींनी घेतलेली छायाचित्रे आणि त्यांच्या निरीक्षणांनंतर अनेक पक्षी अभ्यासकांशी चर्चा झाली. काहींनी सुरुवातीला हा ‘ब्लॅक क्राऊन्ड नाईट हेरॉन’ (रातबगळा) असावा, असा अंदाज व्यक्त केला. मात्र लांबट पाय, संपूर्ण काळे शरीर आणि खास मासेमारी पद्धतीच्या आधारे सर्वांनी एकमुखाने मान्य केले की, हा पक्षी म्हणजे ब्लॅक हेरॉनच आहे!
या दुर्मीळ पक्ष्याच्या भारतातील उपस्थितीची अधिकृत नोंद व्हावी यासाठी डॉ. जोशी यांनी संबंधित माहिती आणि फोटो इंडियन बर्ड जर्नलकडे पाठवले आहेत.
‘ब्लॅक हेरॉन’ कोण आहे?
Black Heron (Egretta ardesiaca) हा काळसर, मध्यम आकाराचा बगळा सेनेगल, सुडान, केनिया, तंजानिया, दक्षिण आफ्रिका आणि मॅडगास्कर यांसारख्या आफ्रिकन देशांमध्ये आढळतो. तो स्थलांतर न करता एकाच परिसरात राहतो. अन्न-पाण्याची टंचाई असेल, तरच तो नवीन ठिकाणी स्थलांतर करतो. युरोपातील काही अपवादात्मक नोंदी (ग्रीस, इटली, आयर्लंड) असून भारतात यापूर्वी त्याचे अस्तित्व नोंदले गेले नव्हते.
काय आहे ‘कॅनोपी फिडींग’?
Canopy Feeding किंवा Umbrella Feeding ही मासे पकडण्याची अनोखी युक्ती असून पक्षी आपले पंख अर्धगोलाकार पसरवतो. त्या सावलीत मासे खेचले जातात आणि त्यांना पकडणे सोपे होते. ही पद्धत अत्यंत थोड्या पक्ष्यांमध्ये – विशेषतः ब्लॅक हेरॉनमध्येच आढळते.
“हे पक्षी इथे कसे आले, अजूनही गूढ!”
“आफ्रिकेतून हे पक्षी चिपळूणमध्ये कसे आले, हे अद्याप न उलगडलेले रहस्य आहे. गेले आठवडाभर मी त्यांना पुन्हा पाहण्याच्या प्रयत्नात आहे. दररोज नवनव्या पाणथळ जागा शोधतो आहे.”
— डॉ. श्रीधर जोशी, पक्षी निरीक्षक, चिपळूण
चिपळूणची जैवविविधता नव्याने उजळली!
ब्लॅक हेरॉनचे हे आगमन केवळ एक दृश्य नाही, तर पर्यावरण संशोधनासाठी आणि भारताच्या पक्षी नोंदींसाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरतो आहे. चिपळूणसारख्या छोट्या शहरात जगातल्या अशा दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन हे येथील निसर्ग संवर्धनासाठीही आश्वासक ठरते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*