दापोली : ट्रकमधील लोखंडी साहित्यसरकल्याने विचित्र अपघात

banner 468x60

लोखंडी साहित्याने भरलेला ट्रक खेडकडून दापोलीच्या दिशेने येत असताना कुवेघाटी वळणावर ट्रकमधील साहित्य मागे सरकले. यामुळे ट्रक उभा झाला.

सुदैवाने ट्रकच्या मागे अन्य वाहने नसल्याने अपघाताचा अनर्थ टळला . माहितीनुसार,दि. १४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातानंतर वाहनांच्या क्षमतेपेक्षा अवजड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोखंडी सळ्यांची वाहतूक करणारा एक ट्रक अवघड घाट पार करत असताना ट्रकमधील लोखंडी साहित्य अचानक मागे सरकले.

त्यामुळे ट्रकचा पुढील भाग उचलला गेला. खेड दापोली या मार्गावर रोज अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. या पूर्वी देखील दापोली-खेड मार्गावर काळकाईकोंड येथे ट्रकमधून लोखंडी सळ्या बाहेर पडून अशाचप्रकारे अपघात झाला होता.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *