BIG Breking चिपळूण : कोकण कट्टा न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट, अखेर गुंडगीरी करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल, रवींद्र भाताडेसह दोघांवर गुन्हा दाखल , चिपळूणच्या आकावर कारवाई होणार का?

banner 468x60

चिपळूणमधील आकले गावात होत असलेल्या वाळू उपश्यावर कोकण कट्टा न्यूजने बातमी दिली असता अखेर गुंडगीरी करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

वाळू माफियांनी चिपळूणमधील पोलीस पाटलावरच जेसीबी चढवला होता याबाबतची बातमी कोकण कट्टा न्यूजने दिली होती. राज्यामध्ये एकीकडे संतोष देशमुख प्रकरण घडत असताना चिपळुणात वाल्मिक कराडचा अवतार पाहायला मिळाला, रवींद्र भाताडे चिपळूणचा वाल्मिक कराड आहे असं आकले गावातील ग्रामस्थानी म्हटलं आहे.

वालुमाफियांच्या गुंडगिरी सुरू असलेल्या चिपळूण तालुक्यातील आकले गावातील . चिपळूण तालुक्यात वाळू माफियांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. अवैध वाळू उपशाचा प्रश्न आता अनेकांच्या जीवावर उठू लागलाय.

चिपळूण आकले-तिवरे नदीतील जुना वडेवाडी येथे बेकायदा वाळू उत्खनन केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. याप्रकरणी रविवारी चौघांवर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद एका महिलेने दिली होती.

रवींद्र गोपाळ भाताडे वय 45, ट्रक्टर आणि ट्रॉली -एम.एच.08-ए.एक्स-6467 वरील चालक, डंपर एम.एच-08-के-9477- वरील चालक आणि जेसीबी एम.एच 12-एक्स.एच-4182 वरील चालक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.चिपळूण तालुक्यातील आकले गावात वाळूउपशाला विरोध करणाऱ्या पोलीस पाटलाच्या अंगावर या गुंडगीरी करणाऱ्या वालूमाफियानी जेसीबी चढवला होता .

आकले गावात असलेल्या नदीमध्ये बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू होत. याचा जाब विचारण्यासाठी गावातील सरपंच पोलीस पाटील आणि काही गावकरी गेले असता त्याच्यावर धमदाटी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 जानेवारी रोजी दुपारी 2.14 ते रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास आकले गावी तिवरेकडून येणाया नदीत जुना वडेवाडी येथे गुन्हा दाखल झालेल्या चार जणांनी एकमेकांच्या संगनमताने विना परवाना बेकायदेशीरपणे नदीतील वाळू चोरीचा प्रयत्न केला.

तसेच जेसीबी चालकाने जेसीबीचा धक्का लागून पोलीस पाटील सुरेश कदम यांना दुखापत होवू शकते याची जाणीव असताना देखील त्याने जेसीबी भरधाव वेगाने चालवून तेथून पळ काढला. याप्रकरणी त्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकले गावातील ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे. आकले नदी पात्रात वाळू माफियांनी दहा ते पंधरा फुटांचे खड्डे पाडले होते .

वाळू उपसा चिपळूणच्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांना का दिसत नाही? असा सवाल उपस्थित केला होता . या घटनेमुळे वाळू माफियांची दादागिरी पुन्हा समोर आली आहे. मात्र चिपळूणचा आका कोण असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *