गुहागर : अंजनवेल येथे चुलीसमोर शेक घेताना भाजलेल्या महिलेचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल येथे चुलीसमोर शेक घेत असताना साडी पेटल्याने गंभीररीत्या भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.


रजनी रघुनाथ संगमेस्कर (वय ५१, रा. अंजनवेल) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या राहत्या घरी घडली होती. चुलीसमोर शेक घेत असताना अचानक त्यांच्या साडीने पेट घेतल्याने त्या आगीत भाजल्या गेल्या. या आगीत त्यांच्या पाठीला तसेच दोन्ही पायांच्या मागील बाजूस गंभीर भाजल्याच्या जखमा झाल्या होत्या.


घटनेनंतर त्यांना तातडीने स्थानिक डॉक्टरांकडे प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील के. ई. एम. रुग्णालय (भोईवाडा, वॉर्ड क्रमांक १६) येथे दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.


मात्र उपचार सुरू असतानाच दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ६:३० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


या प्रकरणी गुहागर पोलीस ठाणे येथे दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११:१० वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आमृ. क्रमांक ०६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *