बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर, अक्षय शिंदेचा गोळीबारात मृत्यू

banner 468x60

बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा तुरुंगातून घेऊन जात अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार (Badlapur School Crime News) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवारी सायंकाळी अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.

या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. गोळीबारानंतर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अक्षय शिंदेला नेण्यात आलं. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला.

यात मोरे गंभीर जखमी झाले. अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून अक्षय शिंदेच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या.

त्यात तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. संजय शिंदे यांनी यापूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम केले आहे. तत्कालीन आयपीएस प्रदीप शर्मा त्याचे नेतृत्व करत होते.


16 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना झाल्याचं समोर आली होती.


16 ऑगस्टला पीडित मुलीचे पालक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहचले होते, परंतु तब्बल 12 तास त्यांना बसून ठेवण्यात आलं असा आरोप स्थानिकांनी केला होता. पोलीस प्रशासानाने दिरंगाई केल्याप्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *