संगमेश्वर : तांबेडी येथे वृद्धाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी येथील एका ६५ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घराच्या शेजारील शेतात झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अशोक सुडुकु सावंत (वय ६५, रा. तांबेडी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना ३ जानेवारीच्या सायंकाळी साडेपाच ते ४ जानेवारीच्या सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली असून, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

banner 728x90 banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, अशोक सावंत हे ३ जानेवारी रोजी सायंकाळी घरून बाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू झाला. ४ जानेवारी रोजी सकाळी तांबेडी येथील हेदीचे भात नावाच्या शेतात आयनाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

अशोक सावंत यांनी कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. वैद्यकीय तपासणीत गळफास घेतल्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे.


या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी सायंकाळी ४.२१ वाजता या घटनेची अधिकृत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे. मयत अशोक सावंत यांच्या पश्चात त्यांचा परिवार असून या घटनेमुळे तांबेडी बौद्धवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *