अखेर खातेवाटप जाहीर – उदय सामंत यांना पुन्हा एकदा उद्योग खातं

banner 468x60

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्‍यांना खातेवाटप जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. त्यामुळे विरोधक दररोज टीका करत होते. हिवाळी अधिवेशन विनाखात्याचे मंत्री म्हणून मंत्र्‍यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने, या शपथ घेतलेल्या मंत्र्‍यांना अधिकृत मंत्रालय मिळाले. उदय सामंत यांना पुन्हा उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *