देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं.
त्यामुळे विरोधक दररोज टीका करत होते. हिवाळी अधिवेशन विनाखात्याचे मंत्री म्हणून मंत्र्यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने, या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अधिकृत मंत्रालय मिळाले. योगेश कदम यांच्याकडे ग्रामविकास, पंचायत खात्याची जबादारी देण्यात दिली आहे. गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन
उदय सामंत यांना पुन्हा उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*