दापोली : महावितरण कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या लक्ष्मण नाटेकर विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

banner 468x60

दापोलीमध्ये वीज देयकाची थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्याने वीजबील भरण्यासाठी कॉल केला असता देयकाची रक्कम न देता शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

banner 728x90

कॉल केला असता वीज ग्राहक लक्ष्मण विठ्ठल नाटेकर (रा. करंजाणी ) याने दबंगगिरी करत शिवीगाळ केली. लक्ष्मण विठ्ठल नाटेकर विरोधात दापोली माहिवतरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची तक्रार दाखली केली आहे. सिध्दारुढ़ श्रीकांत तेवरे हे सहाय्यक अभिंयता महावितरण दापोलीचे अधिकारी आहेत.

सिध्दारुढ़ श्रीकांत तेवरे यांनी या प्रकाराबाबत दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लक्ष्मण विठ्ठल नाटेकर याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दापोली महावितरणच्या कार्यालयातून रोज मिळणारी थकबाकीदार वीज ग्राहकांची यादी घेऊन वीज ग्राहकांना देयकाचे पैसे भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे,

नेहमी प्रमाणे सिध्दारुढ़ श्रीकांत तेवरे यांनी लक्ष्मण विठ्ठल नाटेकरला कॉल केला असता त्याने शिवीगाळ केलीय. लक्ष्मण विठ्ठल नाटेकरची दापोलीमधील करंजाणी येथे चिरेखाण असुन तेथील लाईट बील गेल्या 10 महिन्यापासून बील भरलेले नाहीय.

लक्ष्मण विठ्ठल नाटेकरने आमचे बील एवढे जास्त कसे काय आले आहे असं म्हटलं यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बील भरण्यास सांगितलं, तुमचे बील बरोबर दिलेले आहे. मी स्वता चेक केले आहेत असं बोलल्यावर नाटेकर याला राग आल्याने त्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यांनाफोनवर शिवीगाळी करून तुम्ही लाईट कट करायला या मग मी

बघतो अशी धमकी दिली यानंतर सिध्दारुढ़ श्रीकांत तेवरे यांनी सर्व कॉल रेकॉर्ड दापोली पोलिसांना ऐकवले असताना दापोली पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरुन सदरची एन. सी रजि दाखल करुन याचा तपास पवार यांच्याकडे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *