दापोली : भर रस्त्यात जामगे येथे दोघांकडून महिलांचा विनयभंग, गुन्हा दाखल

banner 468x60

दापोलीतील जामगे येथे धक्कादायक घटना समोर आली आहे.

दापोली तालुक्यांतील जामगे येथील दोन महिला आजारी व्यक्तीला बघायला जात असताना रस्त्यातच दोघांनी या महिलांचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलांनी दापोली पोलीस ठाण्यात केली आहे.

मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजता दापोली तालुक्यातील जामगे येथे दोन महिलांचा दोन आरोपींनी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत दापोली पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील जामगे येथे भर रस्त्यात मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास गावातील रस्त्यावरून दोन महिला एका रूग्णाची भेट घेण्यास निघाल्या असता वाटेत आरोपी झायलो गाडीने

येऊन त्या दोन पिडीत महिलांच्या समोर गाडी लावून उतरला आणि या महिलांना मनात लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं . जामगे येथील दोन सख्ख्या जावा जामगे मोहल्ला येथील घरातून एका रुग्णाला पहायला रस्त्याने पायी चालत जात असताना महमद अली दाऊद नागोठणे हा कार घेवून त्यांच्यासमोर आला आणि गाडी उभी करून गाडीतून खाली उतरला.

तसेच मुज्जफर अस्लम नागोठणे हा मोटारसायकलने तेथे आला या दोघांनी त्यांना शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. याबाबत त्या दोन महिलांनी केलेल्या तक्रारीनुसार दोघांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामधील एकाने महिलेला रस्त्यातच मिठी मारल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय तर दुसऱ्याने महिलेचा उजवा हात वाईट हेतूने पकडला आणि खाली पाडले आणि मनाला

लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केल्या प्रकरणी विनयभंगाची तक्रार दापोली पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. दरम्यान पुढील पुढील तपास मपोना गावडे करत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *