खेड तालुक्यातील खोपी गावातील (जाभेलवाडी) डोंगराच्या पायथ्याशी वसलेली धनगर समाज बांधवांची चार घरे शनिवारी (दि.२२) वणव्यात जळून खाक झाली. वाडीत पाणी व रस्ता नसल्याने काही कुटूंबे उन्हाळ्यात पाण्याच्या जवळ स्थलांतरित झाली आहेत.
त्यामुळे आग लागली तेव्हा घरांमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. वणव्याने लागलेल्या आगीत पार्वती बबन ढेबे, रंजना लक्ष्मण ढेबे, लक्ष्मी जानू ढेबे, मोहन जानू ढेबे यांची घरे जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. घरातील धान्य, भांडी व कपडे जळून खाक झाल्याने चार कुटुंबे बेघर झाली आहेत.
खोपी येथे धनगर बांधवांची घरे जुळून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेऊन सरकारने त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरीचे अध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













