खेड : युवतीचा विनयभंग, तरुणास अटक

banner 468x60

खेड शहरातील एका २८ वर्षीय युवतीचा विनयभंग करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तालुक्यातील चिंचघर-प्रभूवाडी येथील प्रतिक संजय शिंदे (२४) याला पोलिसांनी अटक केली. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.

banner 728x90

त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ऑक्टोबर २०२३ ते १० मार्च २०२५ या कालावधीत घडल्याचे पीडित युवतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. २ वर्षांपूर्वी युवतीची संशयिताशी इन्स्ट्राग्रामवर ओळख झाल्यानंतर इन्स्ट्राग्रामवर मेसेजद्वारे बोलणे सुरू झाले.

२०२३ च्या नवरात्रौत्सवात दोघांची खेडमध्ये प्रत्यक्ष भेटही झाली. मार्च २०२४ मध्ये दोघं लाडघर येथे फिरायलाही गेले होते. यानंतर व्हॉटस्ॲप व्हिडिओ कॉलवर वेळोवेळी बोलणे सुरू असताना अश्लिल शब्द वापरत विनयभंग केला.

संशयिताशी व्हॉटस्ॲपद्वारे चॅटिंग व व्हिडिओ कॉलवर बोलायचे युवतीने कमी केल्यानंतर तिचा अश्लिल फोटो व्हॉटस्ॲपवर स्टेट्सला ठेवत बदनामी केल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.

जातीवाचक शिवीगाळ करत ब्लॅकमेल केल्याचेही पीडित युवतीने पोलीस ठाण्यात तक्रारीत नोंदवल्यानंतर या तरुणास पोलिसांनी अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *