दापोली : हॉर्नबिलच्या पहिल्या घरट्याचा शोध, वाईल्ड ऍनिमल रिस्क्युअर संघटनेकडून शोध

banner 468x60

दापोली म्हटलं की निसर्गाने भरभरून दिलेलं ठिकाण . दाट जंगलांचा कुशीत वसलेले दापोली परिसर म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा आहे.

banner 728x90

याच हिरवाईत एका दुर्मिळ क्षणाची नोंद झाली असून मलबार पाइड हॉर्नबिलच्या पहिल्या घरट्याचा शोध लागलं आहे. दापोलीत हॉर्नबिलच्या पहिल्या घरट्याचा शोध वाईल्ड ऍनिमल रिस्क्युअर संघटनेने लावला आहे.

काळ्या-पांढऱ्या रंगाचा हा राजस पक्षी, त्याच्या डौलदार चोचीसह, निसर्गाच्या गूढ कथांची आठवण करून देतो. घनदाट जंगलात गूढ भासणारा त्याचा आवाज आणि पानांतून झेपावताना होणारा फडफडाट, हीच खरी निसर्गसंगीताची अनुभूती.

मात्र, आधुनिकतेच्या वादळात हे सृष्टीचे रत्न हरवू नये, म्हणून आपणच सजग राहिले पाहिजे. ही केवळ नोंद नव्हे, तर जबाबदारीची साद आहे.

हॉर्नबिल ही केवळ एक प्रजाती नाही, तर जंगलाचे संतुलन राखणारा एक प्रमुख दुवा आहे. त्यांचे घरटे शोधणे, त्यांचे संरक्षण करणे आणि निसर्गाचा वारसा पुढच्या पिढींसाठी जपणे, हे आपले कर्तव्य आहे.दापोलीतील या घरट्याचा शोध म्हणजे एक सकारात्मक संकेत आहेत.

जर तुम्हाला दापोली तालुक्यात कुठेही हॉर्नबिलचे घरटे दिसले, तर आम्हाला नक्की कळवा. आपण एकत्र येऊया आणि हॉर्नबिलच्या घरट्यांचे रक्षण करूया असं आवाहन वाईल्ड ऍनिमल रिस्क्युअर संघटनेने केलं आहे.
तुषार महाडिक 9049440914
सतीश दिवेकर 9307674632
मिलिंद गोरीवले 97644 54454

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *