गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी चिपळूण- पनवेल मेमू स्पेशल सा ंडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ०१०१८ व ०१०१७ क्रमांकाच्या चिपळूण- पनवेल मेमू स्पेशलच्या १३ ते १६ मार्चदरम्यान ८ फेऱ्या धावणार आहेत.
चिपळूण येथून दुपारी ०३:२५ वाजता सुटणारी मेमू स्पेशल
रात्री ०८:३० वाजता पनवेल येथे पोहाचेल.
परतीच्या प्रवासात पनवेल येथून रात्री ०९:१० वाजता सुटून मध्यरात्री २ वाजता चिपळूण येथे पोहाचेल. या स्पेशल मेमूला आंजणी, खेड, कळंबणी, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापेवामने, वीर, गोरेगाव, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण स्थानकात थांबे देण्यात आले आहेत. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, खेड, दापोली व मंडणगड तालुक्यांतील चाकरमान्यांना मेमू स्पेशलमुळे दिलासा मिळाला आहे.
याव्यतिरिक्त मडगाव- पनवेल, मडगाव- एलटीटी या दोन
स्पेशलच्या १६ फेऱ्या धावणार असल्याने चाकरमानी सुखावले आहेत.
०११०२/०११०१ क्रमांकाची मडगाव- पनवेल साप्ताहिक स्पेशल १५ व २२ मार्च रोजी धावेल. मडगाव येथून सकाळी ०८:०० वाजता सुटून सायंकाळी ०५:३० वाजता पनवेल येथे पोहाचेल.
परतीच्या प्रवासात पनवेल येथून सायंकाळी ०६:२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०६:४५ वाजता मडगाव येथे पोहाः चेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल करमाळी, थिवीम, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण स्थानकांत थांबेल.
तसेच ०११०४/०११०३ क्रमांकाच्या मडगाव- एलटीटी साप्ताहिक स्पेशलच्या ४ फेऱ्या धावणार आहेत. १६ व २३ मार्चला धावणारी स्पेशल मडगाव येथून सायंकाळी ०४:३० वाजता सुटून पहाटे ०६:२५ वाजता एलटीटीला पोहाचेल. परतीच्या प्रवासात १७ व २४ मार्चला धावणारी स्पेशल एलटीटीहून सकाळी ०८:२० वाजता सुटून रात्री ०९:४० वाजता मडगाव येथे पोहाचेल.
२० एलएचबी डब्यांच्या स्पेशलला करमाळी, थिवीम, सावंतवाडी, कणकवली, विलवडे, कुडाळ, सिंधुदुर्ग, वैभववाडी, राजापूर, आरवली रोड, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*