दापोली तालुक्यातील आगरवायंगणी येथे दाभोळ पोलिसांनी छापा टाकत गावठी बनावटीची बंदूक व एअर पिस्तुल, शिकारीकरीता वापरणाऱ्या बॅटरी रिकाम्या वापरलेल्या काडतुसाच्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत.
दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २१/०२/२०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी ओकार नथुराम बालगुडे, वय ३१ वर्षे, रा. मधलीवाडी, आगरवायंगणी, ता. दापोली यांचे राहते घरी गावठी बनावटीची बंदूक व एअर पिस्टल, शिकारीकरीता वापरण्यात येणा-या बॅट- या व रिकाम्या वापरलेल्या
काडतुसाच्या पुंगळ्या आढळुन आल्या गैरकायदा व बिगरपरवाना बाळगले स्थिती मिळून आला. एकुण ४४००/- किंमतीचा माल जप्त करण्यात आदा आहे.
यामध्ये २०००/- एक गावठी बनावटीची एका नळीची बंदूक, २०००,००/- एक काळसर व लाल रंगाची प्लास्टिक व लोखंडी बॉडी असलेली एअर पिस्टल, १००/- एक काळसर राखाडी रंगाची एमझेड कंपनीची एम९६१ मॉडेल असलेली तिला लाल बटणे असलेली चार्जिंगची बॅटरी, १००/- एक क्राळसर रंगाची समोर व बाजूला लाइट व वरती लाल बटण असणारी हॅडल असणारी बॅटरी श, २००/- एक काळसर रंगाची समोर लाईट असणारी गोलाकार बॅटरी, ६००/- किंमतीच्या
दोन लाल रंगाच्या प्लास्टिक आवरण असलेल्या रिकाम्या काडतुस आदी साहित्य ताब्यात घेण्यात आले असुन यापुढील तपास दाभोळ पोलीस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













