चिपळूण : खदिजा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

banner 468x60

चिपळूण – गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल,गोवळकोट या विद्यालयात नुकतेच १४ डिसेंबर २०२४ ते १५ डिसेंबर २०२४ पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला.

विद्यार्थी वर्षभर अभ्यासात मग्न असतात वर्षभरात डिसेंबर महिन्यात शाळातून संपन्न होणारे स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांना कला व क्रीडा क्षेत्रातील सुप्त कलागुणांना विकासाची खूप मोठी संधी असते.

गेली कित्येक वर्ष या संस्थेचा शैक्षणिक दर्जा पाहता राज्यस्तरापर्यंत विविध विद्यार्थ्यांनी आजपर्यंत आपलं नावलौकिक केलेला आहे.

विद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अब्दुल अजीज अ.रज्जाक बेग, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. मोहम्मद शफी चांदा, सशाली मोहिते, शिक्षण विस्तार अधिकारी अस्मा देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.सफा खतीब, रिजवाना शफिक चांदा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक इरफान शेख यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचलन संस्थेचे सेक्रेटरी मुजाहिद मेयर यांनी केले. यावेळी शैक्षणिक क्रीडाक्षेत्र व सांस्कृतिक विभाग विभागामध्ये उत्कृष्ट यश मिळवलेला सर्व विद्यार्थ्यांचे गौरव करण्यात आला.

प्रशालेतील असंख्य विद्यार्थ्यांना गायन वादन अभिनय नृत्य यांनी आवड असल्याने त्याच्यातील असे विविध असणारे गुण पालकांसमोर यावेत, या हेतूने सदर वार्षिक स्नेहसंमेलन दरवर्षी शाळेमध्ये घेतले जाते असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ऊरुसा खतीब यांनी आजपर्यंत संस्थेची वाटचाल व आजपर्यंत घडवलेले उत्तम विद्यार्थी तसेच प्रशालामध्ये होणारे अनेक नवनवीन उपक्रम यशस्वी व गुणवंत विद्यार्थी यांचा लेखाजोखा आपल्या मनोगतात मांडला.

संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ. इसहाक खतीब यांनी आमचे विद्यालय ही क्रीडा क्षेत्रात व कला क्षेत्रात, निबंध स्पर्धेमध्ये व विविध उपक्रमामध्ये नेहमीच नैपुण्य दाखवीत असते. याचबरोबर दहावी आणि बारावीच्या परीक्षा मध्ये सुद्धा निकालाची परंपरा कायम राखली असल्याचे संस्थेला या सर्व उपक्रमाचा अभिमान असल्याचे नमूद केले.

गोवळकोट एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये विद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष अब्दुल अजीज अ.रज्जाक बेग, संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ. इसहाक खतीब, व्हा.चेअरमनजफर कटमाले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऊरुसा खतीब, विद्यमान सेक्रेटरी मुजाहिद मेयर ,सहसेक्रेटरी सरफराज गोठे , संस्थेचे पदाधिकारी, लियाकत खतीब, अखलाक मेयर, सलीम नाखुदा, सलीम ताहीर गोठे, रऊफ गोठे, अजमल पटेल, इम्रान खतीब, अजीम पठाण, नादिया खतीब, नुरी हळदे, शिरीन पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख योगेश पेढांबकर तसेच कलाशिक्षक उदय मांडे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे यावेळी आभार मानले गेले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *