दापोलीमधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आता आलेल्या कालानुसार योगेश कदमांचा विजय निश्चित मानला जातोय. कारण अगदी पहिल्या फेरीपासून योगेश कदमांनी घेतलेली आघाडी सोडली नाहीय त्यामुळे शिवसेनेच्या योगेश कदमांचा विजय निश्चित मनाला जातोय.
लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या तीन तासांमध्ये शिवसेनेचे योगेश कदमांना प्रचंड मोठे यश मिळताना दिसत आहे. सर्वच फेरीमध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे. संजय कदमांना एकाही फेरीत आघाडी भेटली नाही . त्यामुळे शिवसेनेच्या योगेश कदमांचा विजय निश्चित मानला जातोय.
लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राबवलेली लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरल्याचे निकालांवरुन दिसत आहे. योगेह्स कदमांचे ग्राऊंड लेव्हलला केलेले काम, स्थानिक पातळीवर साधलेली जातीय समीकरणे ही आता काम करताना पाहायला मिळत आहे. मतमोजणी फेरी 14
दापोली विधानसभा मतदार संघ निकाल
एकूण मतदार : 2, 91, 297
झालेले मतदान : 1, 94, 697
योगेश कदम 12835 मतांनी आघाडीवर
अबगुल संतोष सोनू – मनसे: 2718
कदम योगेश – शिवसेना: 48517
कदम संजय शिवसेना (उबाठा): 35682
मर्चंडे प्रविण – बसपा: 890
कदम योगेश रामदास – अपक्ष : 161
कदम योगेश विठ्ठल – अपक्ष: 74
कदम संजय सिताराम – अपक्ष: 348
कदम संजय संभाजी – अपक्ष : 443
खांबे ज्ञानदेव रामचंद्र- अपक्ष: 498
Nota : 502
कोकणातील सर्वात जलद आणि वेगवान अपडेट – कोकण कट्टा न्यूजवर
▪️Kokan Katta News▪️
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक
https://chat.whatsapp.com/IPkMpgNtJPDEO0ldTXd5hr
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*