गुहागर : प्रेमप्रकरणातून भातगाव पुलावरून महिलेला ढकललं, नालासोपारा, हॉटेल ते दागिन्यांची चोरी, नितीन जोशीला अटक

banner 468x60

सोन्या चांदीचे दागिने व दोन मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने महिलेस बेसावध असताना जीवे ठार मारण्याकरीता गुहागर तालुक्यातील भातगाव पुलावरून पाण्यात ढकलून देवुन तिची ॲक्टीवा गाडी घेवून पळून गेलेल्या आरोपीस संगमेश्वर पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा येथील प्रेयसी सपना हिला नितीन गणपत जोशी (राहणार पाचेरीसडा) हे दोघे एकाच गावातील रहिवासी दिनांक 21 रोजी नितीन याने मुळ गावी काम असल्याचे सांगून तेथे जायचे आहे असे सांगितल्याने त्यावेळी सपना हिने तिच्याकडे असलेले सोन्या चांदीचे दागिने, वापरते दोन मोबाईल व तिच्या भावाने तिच्याकडे ठेवलेली ॲक्टीवा गाडी असे सोबत घेवून आरोपीसह नालासोपारा येथुन एका खाजगी आराम बसने गुहागर परिसरात आले.

तेथे नितीन याने सपना यांची एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली व तो त्याचे घरी निघुन गेला. त्यानंतर दि. 22 रोजी नितिन याने त्या हॉटेलवर जावून आपली प्रेयसी सपना यांना माझा मित्र भातगाव ब्रीज येथे भेटायला येणार आहे असे सांगून आपण त्याला भेटुन नालासोपारा येथे परत जाऊ असे सांगितले.

त्यानंतर नितीन याने सपनाला सोबत घेऊन ॲक्टीव्हा गाडीने भातगाव ब्रीज येथे घेवुन गेला. तेथे रात्री आठच्या सुमारास नितीन याने सपना ही बेसावध असताना त्यांना दोन्ही हाताने उचलुन भातगाव पुलाच्या कठड्यावरुन खाली पाण्यामध्ये टाकले व त्याने तिचे सोने, चांदीचे दागिने असलेली पर्स, मोबाईल व ॲक्टीवा मोटारसायकलसह चोरुन घेवुन निघून गेला.

मात्र नशीब चांगले म्हणून स्थानिकांच्या मदतीने सपनाला वाचवण्यात यश आले यानंतर सपना हिने संगमेश्वर पोलीस ठाण्यात नितीन विरोधात तक्रार दाखल केली होती.

हा गुन्हा महिलाविषयक गंभीर असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस निरीक्षक अमित यादव यांचे तपास पथक आरोपीचे शोधास रवाना केले.

आरोपी नितीन गणपत जोशी यास नालासोपारा येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी नितीन याने सोन्या चांदीचे दागिने, दोन मोबाईल व ॲक्टीवा गाडी चोरल्याचे कबुली दिली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *