खेड तालुक्यातील बोरघर ब्राह्मणवाडी येथे पोलीस असल्याची बतावणी करून २५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी ४ जणांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार १६ ऑक्टोबर रोजी घडला. अब्दुल्ला हुसेन नाडकर, रा. डाकबंगला खेड, फाईक कावळेकर, सलिम उमर चौगुले रा. महाडनाका व अन्य एक जण असे चार जणांवर गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी अविनाश नारायण चव्हाण (वय – ५३ वर्ष, रा. बोरघर ब्राह्मणवाडी, ता. खेड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
१६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०६.३० वा. चे सुमारास बोरघर ब्राह्मणवाडी येथील फिर्यादी यांचे राहते घरी चार जण अनधिकृतपणे प्रवेश करून, आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादी यांना घाबरवले. फिर्यादी यांच्या घराची अनधिकृत झडती घेतली.
त्या चार जणांनी फिर्यादी यांच्या घरातील रिकाम्या कॅनमध्ये ०८ लिटर गावठी हातभट्टीची दारू टाकली व फिर्यादींना अवैध दारू व्यवसायाच्या कारवाईची धमकी दिली.
सदरची केस मिटवण्यासाठी फिर्यादीकडे २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
तसेच १० हजार रुपये घेऊन गेले व उर्वरित रक्कम अब्दुल्ला नाडकर यांच्या खेड येथील ऑफिसमध्ये जमा करावी अशी धमकी दिली असल्याची तक्रारीत नमूद केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













