दापोली : 10 लाखांचे लोन देतो म्हणत मुख्याध्यापकांची ऑनलाईन फसवणूक, 1 लाख 72 हजारांना गंडा

banner 468x60

दापोली येथे मुख्याध्यापकांची ऑनलाईन फसवणूक करून 1 लाख 72 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

banner 728x90

सोशल मीडिया वरून दहा लाखांचे लोन देतो अशी जाहिरात करत दापोली येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला चौघांनी 1 लाख 72 हजार 554 रुपयांना फसवलं आहे.

याप्रकरणी फसवणूक केलेल्या चौघा जणांविरुद्ध दापोली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दापोली येथील उदयनगर येथे घडलीय.

याप्रकरणी फिर्यादी सुधीर नरहरी होनवले (59) या सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांनी चौघां विरुद्ध ही तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार 29 जुलै रोजी सकाळी दहा वाजता सुमारास व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून त्यांना विकास बर्मन, चेतन धुरी, संजीव कुमार आणि अश्विन कुमार या अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून सुधीर होनवले यांना दहा लाख रुपये लोन देतो असं सांगितलं.

यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी, जीएसटीसाठी पैसे भरावे लागतील असं सांगून होनवले यांच्याकडून व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून 1 लाख 72 हजार 554 रुपये हडप केले आणि त्यांची फसवणूक केली आहे. मुख्याध्यापक यांच्या मोबाईल क्रमांकावरून सुधीर होनवले यांना दहा लाख रुपये लोन देतो असं सांगितलं.

यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी, जीएसटीसाठी पैसे भरावे लागतील असं सांगून होनवले यांच्याकडून व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून 1 लाख 72 हजार 554 रुपये हडप केले आणि त्यांची फसवणूक झाली आहे.

याप्रकरणी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 36 मिनिटांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 318 (4), 3 (5), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 प्रमाणे दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *