गुहागर : खोडदे येथील तरुणाचा तळोजा खाडीत आढळला मृतदेह

banner 468x60

ऐन गणेशोत्सवात गुहारमध्ये धक्कदायक घटना समोर आली आहे. गणपती सणासाठी आपल्या मुळ गावी येण्यासाठी निघालेला गुहागर तालुक्यातील खोडदे येथील तरुणाचा मृतदेह तळोजा नदीमध्ये आढळला आहे.

6 सप्टेंबरला रात्री 12 वाजून पाच मिनिटांनी दादर रेल्वे स्टेशन वरून सुटणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसने तो गावी येण्यासाठी निघाला होता. मात्र तो तरुण आपल्या गावी आलाच नाही त्याचा मृतदेह दिनांक 8 सप्टेंबरला दुपारी तळोजा नदीमध्ये आढळला आहे.

ऐन गणेशोत्सवात त्याच्या मृत्यूने खोडदे गावावर शोककळा पसरली आहे.अक्षय संतोष साळवी वय 28 मुळगाव खोडदे तालुका गुहागर सध्या तो मुंबई भांडुप येथे राहत होता. त्याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय पनवेल रायगड येथे आणण्यात आलं आहे.

त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच खोडदे गावातून त्याचे नातेवाईक पनवेल येथे दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *