खेड : म.आय.बी गर्ल्स हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान नाटिकेला प्रथम उत्तेजनार्थ पुरस्कार

banner 468x60

खेड शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मंगळवार दि.13 ऑगस्ट 2024 रोजी पंचायतसमिती शिक्षण विभाग व विज्ञान मंडळ खेडच्या संयुक्त विद्यमाने नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं.

रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आयोजित विज्ञान नाटिका स्पर्धेत भाग घेताना ’पानी का नही कोई सानी’ या नाटकातून पाण्याचे महत्त्वाचे सादरीकरण करून सर्वांना प्रभावित करून प्रथम उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केला.

त्यात सहभागी विद्यार्थिनींमध्ये निदा मणियार, फिरदौस पेडेकर, मेहबुबी दुदुके, तुबा ढेणकर, हलीमा चौगले, जरीना सुर्वे, मारीया मांडलेकर व इकरा नाडकर यांचा समावेश होता. त्यांना निलोफर काझी, जैबा खतीब व रिदा मारूफ या शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले होते.

या सर्वांना रुबिना कडवईकर, आयशा खतीब इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळाले होते. या यशाबद्दल मा.संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब, सर्व संस्थासदस्य, मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार , सर्व कर्मचारी व पालक वर्गांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *